चंद्रपूर : भेकराची शिकार केल्याप्रकरणी १० संशयीत आरोपींना अटक | पुढारी

चंद्रपूर : भेकराची शिकार केल्याप्रकरणी १० संशयीत आरोपींना अटक

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भेकराची शिकार केल्याप्रकरणी ९ संशयीत आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. व्याहाड खुर्द उपवन परिक्षेतांर्गत सामदा (बु.) शेतशिवारात गुरूवारी (दि.१९) शिकारीची घटना उघडकीस आली होती. एका संशयीतास ताब्यात घेतल्यांनतर त्यांने दिलेल्या माहितीच्या आधारे दहा संशयीत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वन्यप्राणी भेकराची शिकार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी महादेव पोहनकर (रा. सामदा) याला शुक्रवारी (दि.१८) ताब्यात घेण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे वनाधिका-यांनी संशयीत आरोपी महादेव पोहनकर घरी भेकराची शिकार करून खाण्यासाठी भाजी शिजविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून संशयीताच्या घरी जावून झडती घेतली असता वन्यजीव भेकराचे शिजलेले मांस आढळून आले.

सदर मांसाचा पंचनामा करून जप्त करण्यात येऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता अंजनाबाई भांडेकर यांच्या खासगी पडीत गट क्र. १०४२ वरील सामदा शेतशिवारात गुरुवारी (दि.१९) दुपारी भेकराची शिकार करून मांस खाण्याकरीता घरी आणल्याचे सांगितल्याने त्याचेसमवेत इतर संशयीत आरोपी सिध्दार्थ परशुराम रामटेके (वय ३०), राकेश कचरु भोयर (२५), अमोल दिवाकर खेवले(३३), गिरीधर देवाजी रामटेके(४१), श्रावण कावरु शेंडे (४६),रामदास सदु भोयर (४८), योगेश हरीदास साखरे (२४), श्रावण बुधा साखरे (६५) सर्व (रा.सामदा ता,सावली जि चंद्रपूर) या आरोपींना ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचलंत का?

Back to top button