चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संवर्धनाकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी | पुढारी

चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संवर्धनाकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : रामाळा तलावाच्या संवर्धनाकरीता इको- प्रोच्या वतीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांना मंगळवारी साकडे घालण्यात आले. तलावातील दुर्गंधीयुक्त दूषित सांडपाणी तातडीने सोडून सौंदर्यीकरण्याच्या पुढील टप्प्यातील कामास सुरूवात करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने रामाळाच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या पुढील टप्प्यातील कामांना तातडीने प्रारंभ करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक रामाळा तलाव आहे. शहरातील दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाणी तलावात सोडण्यात येत असल्याने प्रदूषणाता भर पडली आहे. यामूळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने इको-प्रो संस्थेच्यावतीने स्वच्छता श्रमदान तसेच तलाव संवर्धनाच्या मागणीकरीता सत्याग्रह करण्यात आले. या सत्याग्रहाची दखल घेत वर्षभरापूर्वी तलाव खोलीकरण व संवर्धनाकरीता जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून कामे सुरू करण्यात आले.

तलावाच्या खोलीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले. तसेच काही बांधकाम प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
सौंदंर्यीकरणाच्या पुढील टप्यातील कामांना गती देण्याकरीता तलावातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी तातडीने सोडून कामांना गती देणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या बैठका व कार्याचा आढावा घेण्यात यावा या मागणीसह ऐतिहासिक रामाळा तलावास प्रत्यक्ष भेट देण्याची पालकमंत्र्यांना या प्रसंगी विनंती करण्यात आली.

रामाळा तलावाच्या संवर्धनाकरीता प्रस्तावीत कामे

गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनाकरीता विविध कामे प्रस्तावीत आहेत. त्या कामांना गती देण्याकरीता प्रशासकीय पातळीवर निर्देश देण्याची गरज आहे. प्रस्तावीत कामांमध्ये तलावातील फुट ओवर ब्रिजचे बांधकाम, जलनगर बाजुचे एसटीपी बांधकाम, जलनगर बाजुने रिंटेनिग वॉलचे बांधकाम, रामाळा तलावात येणारा मच्छीनाला वळवीने, तलावाच्या आतिल किल्ला परकोट भिंतीची दुरस्ती, रामाळा तलाव ते बगड खिडकी पाथवे चे बांधकाम, रामाळा उद्यानाचे सौदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.
तलावातील पाणी सोडल्यास कामांना वेळ मिळेल.

रामाळा तलावातील पाणी सोडण्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्याची गरज होती. मात्र त्यास विलंब झाला आहे. पाणी तातडीने सोडल्यास तलाव कोरडा होऊन आवश्यक सर्व मंजुर बांधकामे पुर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल असे याबाबत नियोजन झाले होते.

सांडपाण्यामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी

दरम्‍यान, जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याने कामांना विलंब झाला आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहेत. नियमित सांडपाणी तलावात येत असल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तलाव असल्याने दर्गुंधीयुक्त पाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. या परिसरात रूग्णालय, महाविदयालय आहे. त्यामुळे येथील सांडपाणी त्वरीत सोडून पूढील टप्यातील बांधकामांना गती देण्याची मागणी इको प्रोचे बंडू धोतरे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटी दरम्यान केली आहे.

हेही वाचा  

कोल्‍हापूर : कागल, शिरोळ तालुक्यातील गावे आजपासून बंद ठेवून निषेध

नागपूर : मृतकांची पेन्शन वळवत लाखोंचा घोटाळा करणारी महिला कर्मचारी निलंबित; सर्व खाती गोठवली

राजधानीतील प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’! १४ वर्षांनी सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद  

Back to top button