चंद्रपूर : ब्रम्हपूरीत वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू; दोन दिवसात दुसरा बळी | पुढारी

चंद्रपूर : ब्रम्हपूरीत वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू; दोन दिवसात दुसरा बळी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात धानाचा सरवा वेचण्याकरीता गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा ब्रम्हपूरी तालुक्यातील लाखापूर येथील जंगलात काठ्या आणण्यासाठी गेलेल्या एकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. जगन पानसे, रा. लाखापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जगन पानसे शुक्रवारी (दि.4) जंगलात काठ्या तोडण्याकरीता गेला होता. रात्र होऊनही घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली. जंगलातून परत न आल्याने वाघाच्या हल्यात ठार झाल्याचा संशय वर्तविण्यात येत होता. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. शनिवारी सकाळी वनविभागाच्या देखरेखीखाली त्याचा शोध घेतला असता जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

हेही वाचा :

Back to top button