अकोला : तीन तलाकचा गुन्हा दाखल : दहा जणांना अटक | पुढारी

अकोला : तीन तलाकचा गुन्हा दाखल : दहा जणांना अटक

अकोला: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बोरगाव मंजू येथील एकाने तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला सोडून दिले. यामुळे त्याच्यावर पत्नीच्या फिर्यादीवरून मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकारावे संरक्षण) कायदा 2019 चे कलम 4 नुसार बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा त्याच्यासह त्याच्या परिवारातील 10 जणांविरूद्ध दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेने तक्रारीत नमूद केले की, शेख हबीब शेख दुला याच्यासोबत वाडेगाव येथे मुस्लीम रितीरिवाजानुसार 19 एप्रिल 2012 रोजी विवाह झाला होता. काही दिवसानंतर पतीने गुरांचा व्यवसाय करायचा आहे, असे म्हणून माहेरहून १ लाख रूपये आणण्याची मागणी केली. त्यानंतर गर्भवती असतानाही दीर, नणंद, जेठाणी यांनी उपाशीपोटी ठेवून छळ केला. पतीला गोवंशाच्या कत्तलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हाही 75 हजार रूपये माहेरहून दिले होते. मात्र, असे असताना छळ कमी होत नव्हता. अशातच पती फारकतीची मागणी करीत होता.

27 ऑक्टोबर 2022 रोजी पती शेख हबीब, दीर शेख सादीक, चुलत सासरे शेख हयात शेख इमाम असे माहेरी वाडेगाव येथे आले. व पतीने तीन वेळा तलाक म्हटले आणि रिश्ता संपला, असे म्हणून निघून गेला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दहा जणांविरूद्ध भादंविचे कलम 34, कलम 498 अ, मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा 2029 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button