केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा: फॉस्फेटिक, पोट्याश खतांच्या नवीन दरांना मंजुरी | पुढारी

केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा: फॉस्फेटिक, पोट्याश खतांच्या नवीन दरांना मंजुरी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने फॉस्फेटिक तसेच पोट्याश खतांवर पोषक तत्व आधारित नवीन दरांना मंजुरी दिली आहे. निर्णयामुळे या खतांच्या दरात आता घट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाने यावरील अनुदानासाठी ५१ हजार ८७५ कोटी रुपये देखील मंजूर केले आहेत. हे अनुदान १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या रब्बी हंगामासाठी राहील.

मंत्रिमंडळाने नाइट्रोजन (एन), फॉस्फोरस (पी), पोट्याश (पोटाश) वर पोषक तत्व आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दर किलोग्रॅम दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नायट्रोजन ९८.०२ रुपये किलो, फॉस्फरस ६६.९३ रुपये किलो, पोट्याश २३.६५ रुपये किलो तसेच सल्फर ६.१२ रुपये किलो प्रमाणे मिळेल.

केंद्राच्या निर्णयामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फॉस्फेट आणि पोट्याश खत अनुदानित तसेच स्वस्त दरात उपलब्ध होतील. तसेच शेती क्षेत्राला मदत मिळेल. या निर्णयामुळे खत तसेच कच्च्या मालाची आंतरराष्ट्रीय दरातील अस्थिरतता केंद्र सरकार ला सहन करावे लागेल. शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत उपलब्ध व्हावे यासाठी खत कंपन्यांना स्वीकृत दरानुसार अनुदान दिले जाईल.फॉस्फेट तसेच पोट्याश खतांवर पोषक तत्व आधारित अनुदान १ एप्रिल २०१५ पासून नियंत्रित केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button