भंडारा : प्रेयसीकडून प्रियकराच्या हत्येचा प्रयत्न | पुढारी

भंडारा : प्रेयसीकडून प्रियकराच्या हत्येचा प्रयत्न

भंडारा; पुढारी वृत्‍तसेवा प्रेमसंबंध न ठेवण्याच्या कारणावरुन प्रेयसीने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रियकराचे डोळे बंद करुन, हात बांधून धारदार हत्‍याने वार करुन प्रियकराचाच खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्‍कादायक घटना भंडारा तालुक्यातील नांदोरा झिरी येथे (गुरुवार) रात्री घडली. गोकुळ रनभिड वंजारी (वय २२) रा. मौदी (पहेला) असे गंभीर जखमी प्रियकराचे नाव असून, प्रियंका (नाव बदललेले) (वय १९) व निरज पडोळे (वय २४, दोघेही रा. मानेगाव बाजार ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

‘भेटवस्‍तू आणली आहे डोळे बंद कर….’

गोकुळ आणि प्रियंका यांच्यात प्रेमसंबंध होते. २७ ऑक्‍टोबर रोजी गोकुळ हा नांदोरा झिरी देवस्थानाच्या पहाडीवरील एका मंदिराच्या मागे जाऊन थांबला होता. तेव्हा प्रियंका व निरज पडोळे हे दोघे तिथे आले. प्रियंकाने गोकुळजवळ जाऊन तुझ्यासाठी भेटवस्तू आणली आहे. तू आपले डोळे बंद कर, असे सांगितले. गोकुळने डोळे बंद केले. त्यानंतर प्रियंकाने गोकुळच्या डोळ्यावर पट्टी बांधली. स्कार्फने त्याचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर एका धारदार अवजाराने गोकुळच्या डोक्यावर वार केला. या झटापटीत गोकुळच्या गालावर, गळ्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या.

प्रेमसंबंध न ठेवण्याच्या कारणावरुन हा खुनाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गोकुळ वंजारी याच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी प्रियंका आणि निरज यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button