अमरावती: मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले | पुढारी

अमरावती: मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बडनेरा रेल्वे स्थानकावरून काही अंतरावर असलेल्या मालखेड रेल्वे गावाजवळ अप लाईनवर मालगाडीचे तब्बल 20 डबे रुळावरून घसरले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री अथक प्रयत्न करीत रुळावर असलेले मालगाडीचे डबे क्रेनच्या मदतीने हटविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बडनेरा रेल्वे स्थानकावरुन नागपूरच्या दिशेने मालखेड रेल्वे येथे रविवारी रात्री 11.25 वाजता टिमटाळाकडे जाणाऱ्या कोळसा वाहतूक करणाऱ्या (PSSS-11405) मालगाडीचे 20 डबे रुळावरून घरसले. मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रवाशी वाहतूकीला फटका

मालगाडीला अपघात झाल्याने ऐन दिवाळीच्या वेळेस रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या. दुर्घटनेनंतर जवळपास एक तास रेल्वे रुळावरील वाहतूक पूर्णतः बंद होती. अधिकारी व कर्मचार्यांनी दोन ते अडीच तास सज्ज राहून युद्ध स्तरावर काम केले. क्रेनच्या मदतीने रेल्वे रुळावरील डब्बे बाजूला केले.

अनेक गाड्या रद्द

मालखेड येथे झालेल्या अपघातामुळे 12140 नागपूर-सीएसएमटी ही गाडी धामणगाव ते नागपूर परत पाठवित रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे 12119 अमरावती-नागपूर, 11040 गोंदिया-कोल्हापूर, 01372 वर्धा-अमरावती, 17642 नरखेड-काचेगुडा, 11121 भुसावळ-वर्धा, 12106 गोंदिया-सीएसटीएम, 12136 नागपूर-पुणे, 12120 अजनी-अमरावती, 12140 नागपूर-सीएमएमटी, 01374 नागपूर-वर्धा या सोमवार, 24 ऑक्टोबरला धावणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या.

अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

22845 पुणे-हटिया, 12261 सीएसएमटी-हावडा, 12139 सीएसएमटी-नागपूर, 22847 विशाखापट्टणम-एलटीटी, 12656 चेन्नई-अहमदाबाद या गाड्या चांदूर बाजार-नरखेड मार्गे वळविण्यात आल्या. 11122 वर्धा-भुसावळ, 20819 पुरी-ओखा गाडी वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे वळविण्यात आली. 12656 चेन्नई-अहमदाबाद ही नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे वळविण्यात आली. 12834 हावडा-अहमदाबाद ही गाडी पुलगाव-नागपूर-नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा वळविण्यात आली.

12860 हावडा-सीएमएमटी, 12129 पुणे-हावडा, 12844 अहमदाबाद-पुरी, 18029 एलटीटी-शालिमार या गाड्या नरखेड मार्गे वळविण्यात आल्या. 22905 ओखा-हावडा, 12145 एलटीटी-पुरी, 12809 सीएसएमटी-हावडा या गाड्या गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या. 12160 जबलपूर-अमरावती, 12406 निजामुद्दीन-भुसावळ या गाड्या कमी करण्यात आल्या. 12655 अहमदाबाद-चेन्नई, 22738 हिसार-सिकंदराबाद गाड्या अकोला-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आल्या. सीएसएमटी-गोंदिया, 12135 पुणे-नागपूर, 22138 अहमदाबाद-नागपूर, 18029 एलटीटी-शालिमार, 11039 कोल्हापूर-गोंदिया, 12859 CSMT-हावडा, 12289 CSMT-नागपूर, 12811 LTT-HATIA, 12833 अहमदाबाद-हावडा, 01140 मडगाव-नागपूर, 13426 सुरत-मालदा टाउन, 12406 निजामुद्दीन-भुसावळ, 12130 हावडा-पुणे, 22512 कामाख्या-एलटीटी, 12810 हावडा-सीएसएमटी, 22827 पुरी-सुरत, 12950 संत्रागाची-पोरबंदर, 22940 बिलासपूर-हापा, 12834 हावडा-अहमदाबाद या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

हेही वाचा 

पुणे: त्यांची दिवाळी साजरी झाली कामातच

 जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

 पुणे: एसटीच्या अधिकार्‍याला चार एजंटांकडून शिवीगाळ

Back to top button