जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक | पुढारी

जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील शेतकऱ्याने अंगणात सुकवण्यासाठी टाकलेल्या कापसाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने सुमारे १८ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवार (दि.23) ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र माणिक चौधरी (५०, रा. फुफनगरी, जळगाव) हे कुटुंबीयांसह वास्तव्याला असून त्यांनी शेतामध्ये कापसाची लागवड केली होती. मात्र रविवारी (दि.23) दुपारी साडेचार वाजता त्यांनी अंगणामध्ये कापूस सुकवण्यासाठी टाकलेला असताना अचानक महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरून शॉर्टसर्किट झाले आणि त्यांच्या कापसाला आग लागली. या आगीमध्ये सुमारे १८ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यासंदर्भात दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्सटेबल अनिल फेगडे हे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button