जालना-अंबड मार्गावर बस उलटून ३५ हून अधिक प्रवासी जखमी

जालना-अंबड मार्गावर बस उलटून ३५ हून अधिक प्रवासी जखमी

जालना,पुढारी वृत्तसेवा : अंबड-जालना मार्गावरील गोलापांगरी टोलनाक्याजवळ गेवराई आगाराची बस (क्र. एम एच 20 बी एल 2299) उलटली. या अपघातात सुमारे ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली.

बीड जिल्ह्यातील गेवराई आगाराची बस जालना येथून गेवराईकडे जात होती. या बसमध्ये ६० ते ७० प्रवासी प्रवास करत होते. जालना शहरापासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या गोलापांगरी गावाजवळ आले असता चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला उलटली. यामध्ये ३५ हून अधिक प्रवाशी जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात वाहकाच्या देखील डोक्याला दुःखापत झाली आहे. याबाबत माहिती मिळताच जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news