धक्कादायक! स्मार्टफोनसाठी आधी अपहरण; सामूहिक अत्याचारानंतर फेकले नदीत

धक्कादायक! स्मार्टफोनसाठी आधी अपहरण; सामूहिक अत्याचारानंतर फेकले नदीत
Published on
Updated on

वाराणसी : यूपीतील वाराणसी येथे मोबाईल स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने नववीतील विद्यार्थिनीच अपहरण केले. तिला २० हजार रुपयांच्या मोबदल्यात तीन मुलांना विकून टाकले. या मुलांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. नंतर तिला गंगा नदीत फेकून पळून गेले.

एका मच्छिमाराने या मुलीला वाचविले आणि पोलिसांना ही बाब कळविली. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, यापैकी ४ जण अल्पवयीन आहेत. पीडित विद्यार्थिनीच्या घराचे बांधकाम सुरू होते. एक मजूर आजारी पडला तर त्याने त्याच्याऐवजी त्याच्या मुलाला कामावर पाठवले. या मुलाला मोबाईल फोन खरेदी करायचा होता. विद्यार्थिनीला पाहून त्याने तिच्या अपहरणाचा कट रचला आणि एका मित्राच्या मदतीने अमलात आणला. मुलीला ती शिकवणीहून परतत असताना वाराणसीहून चौबेपूरला नेले आणि तीन मित्रांना विकून टाकले आणि गाझीपूरला परतला. तिन्ही खरेदीदार आरोपींनी वाराणसी हायवेलगत एका शेतात तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केले. नंतर तिला गंगेच्या पुलावरून फेकून दिले. मुलांनी तिच्या अपहरणासाठी गुंगीचे औषध वापरले होते. अल्पवयीनांची रवानगी बालसुधारगृहात तर एका आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news