घरी परतत असताना रुई-रामनगर दरम्यान पुलावर अचानक पाण्याचा लोंढा आला. या लोंढ्यात उत्तम राठोड वाहून गेले. त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. गुरुवारी सकाळी बोरीसिंह गावाजवळ गाळात त्यांचा मृतदेह आढळला. याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. उत्तम राठोड यांच्या मागे पत्नी, दोन मुले, असा आप्त परिवार आहे. दरम्यान, गुरुवारीही यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळी दीड तास जोरदार पाऊस बरसला.