अमरावती: निर्दयी पित्यानेच लावून दिला मुलीचा बालविवाह | पुढारी

अमरावती: निर्दयी पित्यानेच लावून दिला मुलीचा बालविवाह

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने 13 वर्षीय मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शेंदुरजना घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑक्टोबर रोजी घडली. ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून शेंदुरजना घाट पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह ४ जणांविरुध्द कलम ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

या महिलेच्या तक्रारीनुसार, ती पतीपासून गेल्या दहा वर्षांपासून विभक्त राहते. त्यांची छोटी मुलगी आईकडे, तर मोठी मुलगी ही वडिलांकडे राहते. मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन पतीने १३ वर्षीय मुलीचा सचिन हेमराज राठोड नामक तरुणाशी विवाह केला आहे, असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button