

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट कोस्ट रायडर्स मिट च्या (WCRM) वतीने दरवर्षी मानाचा 'रायडर मिट' हा उपक्रम घेतला जातो. या इव्हेंटमध्ये भारताच्या विविध राज्यांतील आणि परदेशातील बुलेट क्लब सहभागी होतात. फक्त निमंत्रित आणि निवडक क्लबना येथे सहभागी केले जाते. गेली २ वर्षे सलग रॉयल रायडर्सचे सदस्य या इव्हेंटमध्ये सहभागी होतात. आणि प्रत्येक वर्षी स्पर्धेत चांगले यश मिळवितात. या वर्षी हा सोहळा सिल्वासा, दीव दमन येथे आयोजित केला होता.
(WCRM) यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसचे आयोजन केले जाते. देशभरातून निवडक सुमारे ६०० बुलेटस्वार वेगवेगळ्या राज्यातून या उपक्रमासाठी येतात आणि रेसिंगमध्ये आपले कौशल्य आजमावतात. अशाच प्रकारे कोल्हापूर रॉयल रायडर्स बुलेट ग्रुपने ३ प्रकारामध्ये बक्षीस पटकावून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करून रेसिंगमध्ये कोल्हापूरचा दबदबा कायम राखला आहे. यातील अत्यंत कठीण अशा 'टाइम ट्रायल' या स्पर्धेत रॉयल रायडर्सच्या रायडरनी जबरदस्त यश मिळवले.
संततधार पाऊस झाल्यामुळे खूप चिखल झाल्याने या स्पर्धेचा ट्रॅक खूप अवघड झाला होता. भले भले रायडर्स ही स्पर्धा पूर्ण करताना दमत होते. रॉयल रायडर्सनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
६५० CC क्लास मध्ये रायडर यश सबनीस यांनी पहिला क्रमांक पटकाविला.
500 cc क्लासमध्ये क्लबचे अनुभवी रायडर महेश चौगुले यांनी 2 रा क्रमांक.
हिमालयन ४१० cc क्लासमध्ये रायडर पार्थ अथने यांनी २ रा क्रमांक पटकावला.
३५० cc क्लासमध्ये रायडर आकाश बडे यांनी ४ था क्रमांक पटकावला.
क्लबचे रायडर्स या इव्हेंट मधील बाकीच्या स्पर्धा स्लो रेस, टो युअर बडी आणी इतर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्पर्धेत उतरण्यासाठी ग्रुपच्या रायडर्स नी भरपूर प्रॅक्टिस केली होती. अलंकार गॅरेजचे अमोल माळी, निपाणी येथील पांडुरंग चव्हाण यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार यांचे विशेष प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. या व्यतिरिक्त इव्हेंटमध्ये मोहन वाईंगडे, रोहित पवार, संतोष धनवडे, अभिजीत काशिद, मेहुल ठक्कर, संजय ओसवाल, विपूल ओसवाल, रोहन पाटील, प्रकाश तेजम, पिनाक गोखले, स्वप्नील पाटील क्लबच्या रायडर्सनी सहभाग नोंदविला.
पुढील वर्षी वेस्ट कोस्ट रायडर्स मिट (WCRM) चे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या रायडर मेनिया या स्पर्धेसाठी क्लबचे रायडर्स जोरदार प्रॅक्टिस करत आहेत.
हेही वाचलंत का ?