यवतमाळ : मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून केली वडिलाची हत्या | पुढारी

यवतमाळ : मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून केली वडिलाची हत्या

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ येथील दिग्रस तालुक्यातील शेतात राहणाऱ्या वडिलांना मुलाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुलाब अमृत पडवाळ (वय ६०) असे मृत वडिलाचे नाव आहे. धनसिंग गुलाब पडवाळ (वय ३०) वर्ष असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

वडील शेतातील घरात असताना सायंकाळी अचानक मुलगा धनसिंग याने या ठिकाणी येवून कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये वडील जागीच ठार झाले. याबाबतची माहिती स्‍थानिकांना समजताच घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना देण्यात आली. घटनास्‍थळी पोलीस तात्‍काळ दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

सांगली: शेतातून घरी जाताना अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्‍यू 

डोंबिवली : कॉसमॉस बँकेला ६.३० कोटींचा चुना; नामांकित कंपन्यांसह बिल्डर्स लॉबीवर कारवाई 

कोल्हापूर: लाखो भाविकांच्या उपस्थितीत आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेस प्रारंभ

Back to top button