म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेस आज ( दि.११) प्रारंभ झाला. पाच दिवस ही यात्रा चालणार आहे. आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असल्याने कुर्ली येथील पालखी येण्यास दुपारी बारा वाजले. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर आप्पाचीवाडीतील खडकावरील मंदिरातील वालंग छत्री वाड्यातील मंदिरात आल्या. तेथून दोन्ही पालख्या ढोलताशाच्या निनादात मिरवणुकीने खडकावरील मंदिरात आल्या.
दोन्ही पालख्या वाजत गाजत मंदिरात आल्या. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवाची स्थापना करण्यात आली. व उत्सवाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मानकरी यांच्या हस्ते देवाला अभिषेक करण्यात आला. देव बसवल्यानंतर हेडाम खेळण्यात आले. ही यात्रा पाच दिवस चालणार असून यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार आहे. या यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्रातून कोकणातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. लाखो भाविक येथे दाखल होत असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडते. परंतु निपाणी पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे. ओढ्याला आलेल्या पाण्यातून कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथांची पालखी मंदिरात आली.
हेही वाचलंत का ?