बुलढाणा : पुलाच्या कठड्याला कार धडकून २ ठार, ३ जखमी | पुढारी

बुलढाणा : पुलाच्या कठड्याला कार धडकून २ ठार, ३ जखमी

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : वाहनावरील ताबा सुटून पुलाच्या कठड्यावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहनामधील महिला व सहा वर्षीय मुलगा जागीच ठार झाले. तर अन्य तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

खामगाव – चिखली मार्गावर गणेशपूर – मोहाडी दरम्यान पुलावर हा अपघात झाला. जळगावमधील जामोद तालूक्यातील गाडेगाव खुर्द या गावातील अवचार परिवार वाहनातून कामानिमित्त चिखली येथे निघाले होते. गणेशपूर – मोहाडी दरम्यानच्या पुलावर वाहनासमोर जनावरे आडवे आल्याने चालकाचा भरधाव वाहनावरील ताबा सुटून वाहन पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही धडक एवढी भीषण होती की, वाहनामध्ये बसलेल्या नंदा विठ्ठल अवचार(६०) व ऋषभ अंगद अवचार(६) हे दोघे जागीच ठार झाले. या दुर्घटनेतील गंभीर जखमींना अकोला येथे दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा;

Back to top button