अजित पवार पुन्हा भाजपमध्ये येणार का? भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट | पुढारी

अजित पवार पुन्हा भाजपमध्ये येणार का? भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना पासूनच धुसपुस सुरू होती. आता अजित पवारांच्या वक्तव्याने ती बाहेर निघत आहे. या पक्षात लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचे सुतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

पुण्यात शनिवारी पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध राजकीय विषयावर आपले भाष्य व्यक्त केल. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सर्वच पक्षात धुसपुस सुरू होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ती सुरू होती. ती आता चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार यांनीच वक्तव्य केले आहे की, मला त्या सरकारमध्ये असताना गृहमंत्री व्हायचे होते. त्यांच्याच तोंडून हे आले आहे. त्यामुळे या पक्षाची अवस्था एक दिवस अशी होईल की त्या पक्षात कुणी राहणार नाही. लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट या पक्षात होणार आहे. अजित पवार पुन्हा भाजप मध्ये येतील काय? या प्रश्नावर मात्र त्यांनी मिश्किलपणे सांगितले की, या पक्षात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होईल.असे चित्र आहे.

वेदांता प्रकरणी बोगस आंदोलन..

वेदांत प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे आंदोलन बोगस आहे. त्यांनी सरकारमध्ये असताना काही काम केले नाही. आताही ते काही काम करत नाहीत. वेदांता प्रकरणाला संपूर्णपणे उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. ते 18 महिने मंत्रालयात कामकाजासाठी आले नाही. त्यांच्याच काळात हा सर्व प्रकार झाल्याने वेदांत प्रकल्प आपल्या हातून गेला, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

Back to top button