अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणी पीसी सिंगला नागपूर विमानतळावर अटक | पुढारी

अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणी पीसी सिंगला नागपूर विमानतळावर अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: जबलपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर येथील नॉर्थ इंडिया बोर्ड ऑफ एज्युकेशनचे प्रेमचंद्र सिंग उर्फ पीसी सिंग याला आज (दि.१२) नागपूर विमानतळावरून अटक केली. ईओडब्ल्यू टीम त्याला ताब्यात घेऊन जबलपूरला घेऊन जाणार आहे. जबलपूरमधील पीसी सिंग हा मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील चांदसुरारी गावाचा आहे.

प्रेमचंद्र सिंग उर्फ पीसी सिंग याच्या अटकेसाठी, त्याचे परदेशातून परतणे आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती. या संदर्भात ईओडब्ल्यू मुख्यालयातून सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात होता. सोमवारी नवी दिल्लीहून बंगळुरूमार्गे नागपूरला पोहोचल्यावर सीआयएसएफच्या मदतीने त्याला नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. सध्या ईओडब्ल्यू आणि इतर एजन्सी त्याची चौकशी करत आहेत.

जबलपूरमध्ये गेल्या आठवड्यात ईओडब्ल्यूने पीसी सिंग याच्या घरावर छापा टाकला. ट्रस्ट संस्थांच्या लीज नूतनीकरणात फसवणूक करणे, ७ कोटींहून अधिक कर न भरणे, अशी प्रकरणे समोर आली आहेत. ईओडब्ल्यूच्या तपासणीत त्याच्या घरातून दीड कोटी रुपयांच्या रोख रकमेसह अनेक मालमत्ता उघडकीस आल्या. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.

पीसी सिंह यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेल्या छाप्यात ईओडब्ल्यूच्या तपासात १ कोटी ६५ लाख रुपये रोख आणि १८ हजार डॉलर्सचे विदेशी चलन, ९० लाख रुपयांच्या आलिशान कारसह ९ कार, विजयनगरमध्ये २ किलो सोने आणि काळा पैसाही सापडला आहे. स्वतःची शाळा यासोबतच संस्थांच्या कागदपत्रां व्यतिरिक्त एकूण १७ मालमत्तांची कागदपत्रे, ४८ बँक खातीही कार्यालयातून प्राप्त झाली आहेत. त्यानंतर बँकांकडून तपशील काढला जात आहे.

आर्थिक गुन्हे पथकाच्या छाप्यानंतर उत्तर भारतातील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पीसी सिंग उर्फ प्रेमचंद सिंग याच्याविरोधात भारतात सुमारे ९९ गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. या शिवाय झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगालम, हरियाणा आदी राज्यांतही गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button