भंडारा : झोपेत सर्पदंश होऊन दोन भावंडांचा मृत्यू

देव्हाडा खुर्द येथे झोपेत सर्पदंश होऊन दोन भावंडांचा मृत्यू
देव्हाडा खुर्द येथे झोपेत सर्पदंश होऊन दोन भावंडांचा मृत्यू
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : रात्री जेवणानंतर दोन्ही भावंडे एकाच बेडवर झोपले होते. दरम्यान, घरात आलेल्या विषारी सापाने दंश केल्याने दोघांचाही मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.

उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) व सुशिल बलबीर डोंगरे (वय ८, रा. देव्हाडा खुर्द) अशी मृत भावंडांची नावे आहेत. दोघेही गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अनुक्रमे पाचवी व दुसरीत शिकत होते. या घटनेमुळे डोंगरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देव्हाडा खुर्द येथील डोंगरे कुटुंबात आजी वंदना, आई शालू व मृतक दोन्ही मुले रात्री जेवण झाल्यानंतर झोपले होते. दोन्ही मुले एकाच बेडवर झोपले असताना घरातील मागच्या दारातून घरात दडी मारून बसलेल्या विषारी सापाने दोन्ही मुलांचा चावा घेतला. मोठ्या मुलाच्या कानाला चावा घेताच तो खडबडून जागा झाला. त्याने आईला सांगताच सर्वांनी शोधाशोध केली असता साप दिसून आला.

घरात आरडाओरड सुरु होताच शेजारी धावून आले. सापाला ठार मारण्यात आले. दोन्ही मुले अस्वस्थ होताच उपसरपंच प्रमोद हिंगे व ग्रामस्थांनी त्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर दिसताच भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री दरम्यान उत्कर्ष डोंगरे याचा मृत्यू झाला. लहान मुलाची प्रकृतीही नाजूक दिसताच नागपूर येथील मेडीकल कॉलेजला दाखल करण्यात आले. मात्र, सुशिल डोंगरे याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, हवालदार लंकेश राघोर्ते, नायक शिपाई नेपाल गभणे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news