भंडारा: तलावात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू | पुढारी

भंडारा: तलावात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : अड्याळ येथील चकारा मालगुजारी तलावावर पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.9) दुपारी उघडकीस आली. भारत ओमप्रकाश पाठक (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्‍यान, तीन वर्षांपूर्वी मृतकाचे वडील ओमप्रकाश पाठक यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पवनी तालुक्यातील चकारा येथील भारत ओमप्रकाश पाठक हा विवेकानंद विद्यालय अड्याळ शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. आई व बहीण नागपूर येथे मामाच्या गावी गणपती विसर्जनासाठी गेले असताना भारत चकारा मालगुजारी तलावात सायकल घेऊन पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्‍याचा बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा : 

Back to top button