वाशीम : विकासवादी धोरणांची अंमलबजावणी हेच ‘बसपा’चे लक्ष : ॲड. संदीप ताजने | पुढारी

वाशीम : विकासवादी धोरणांची अंमलबजावणी हेच 'बसपा'चे लक्ष : ॲड. संदीप ताजने

वाशीम: पुढारी वृत्तसेवा: पुरोगामी महाराष्ट्रात विकासवादी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सत्तेत येणे आवश्यक आहे. केवळ फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा वापर करीत सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांना खरी चळवळ दाखवून देण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे हेच बसपाचे लक्ष आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी केले.

वाशीम येथे आज (दि.११) ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानांतर्गत आयोजित सभेला संबोधित करताना ताजने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश प्रभारी प्रमोद रैना प्रमुख उपस्थित होते.

संदीप ताजने म्हणाले की, बहुजनांसह सर्वजनांच्या विकासासाठी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली बसपा ‘किंगमेकर’ ठरणे आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्यातील नेते, पदाधिकारी, कॅडरने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आता वाशीममध्ये सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. तरुणांना प्राधान्यक्रमाने नेतृत्वाची संधी दिली जाईल. यासाठी त्यांना पक्षात ५० टक्के भागीदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बसपाकडे निश्चित अशी ‘व्होट बँक’ आहे. मतदारांच्या याच विश्वासासह केडरच्या मेहनतीच्या बळावर बसपा ताकदीनीशी समोर येवून राज्यातील ‘बॅलन्स ऑफ पॉवर’ ठरेल, असा विश्वास देखील ताजने यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे, प्रदेश सचिव अविनाश वानखडे, जिल्हा प्रभारी ॲड राहुल गवई, ॲड. संघनायक मोरे, अशोक जाधव, उमेश कुऱ्हाडे, प्रकाश आठवले, संतोष वाठोरे, जिल्हा अध्यक्ष बबनराव बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन धांडे, जिल्हा महासचिव भारत साळवे, जिल्हा कोषाध्यक्ष दीपक वानखडे, मोहन खिराडे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button