काँग्रेसची सत्ता आल्यास शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार : नाना पटोले | पुढारी

काँग्रेसची सत्ता आल्यास शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार : नाना पटोले

अकोला : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक हे विद्यार्थी व समाज घडविण्यात मोलाची भूमिका पार पाडतात. सद्यस्थितीत शिक्षकांना मात्र विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्येवर भाजप सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे. शिक्षकांचा सन्मान करणे ही कायमच काँग्रेसची भूमिका राहिली असून काँग्रेस हा सदैव शिक्षकांसोबतच आहे. आगामी काळात काँग्रेसची सत्ता आल्यास राजस्थान, छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगितले.
अकोल्यात काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आ. लक्ष्मणराव तायडे, संजय राठोड, देवानंद पवार, श्यामभाऊ उमाळकर, धनंजय देशमुख, अशोक अमानकर, डॉ. सुधीर ढोणे, जावेद अन्सारी, संजय बोडखे, प्रकाश तायडे, साजिदखान पठाण, मो. बदरुजम्मा, सचिन तिडके, डॉ. प्रशांत वानखडे पाटील, डॉ. झिशान हुसैन, चंद्रशेखर चिंचोलकर, गणेश काकड, रमाकांत खेतान, निखिलेश दिवेकर, नगरसेवक पराग कांबळे यासह काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे प्रमुख नेते उपस्थित होते.

देशाची जागतिक स्तरावर प्रगती ही तीन बाबींवर अवलंबून असते त्यापैकी मुख्य बाब म्हणजे शैक्षणिक प्रगती, देशाच्या प्रगतीत हीच शैक्षणिक प्रगती वाढविण्यात शिक्षकांचा प्रमुख वाटा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश तायडे यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विभागीय उपाध्यक्ष अमित बोबडे, विभागीय सचिव सुधाकर वाहुरवाघ, जिल्हाध्यक्ष सुयोग खडसे, महासचिव सुनील जाधव, महासचिव संदीप सेवलकर, डॉ. नितीन देऊळकर, प्रा. उमेद जागीरदार, धनंजय देशमुख, पंकज देशमुख, आकाश शिरसाठ, प्रशांत प्रधान, विनोद राठोड, सोमेश डिगे, लहुजी रोडे, पंकज वाढवे, हरीश चौधरी, हरीश कटारिया, संदेश वानखडे , रामराव राठोड, मंगेश वानखडे, मुजाहिद खान, भुतकर यांनी परिश्रम घेतले.

यावेळी प्रा. सुभाष गादिया, प्रा. डी. ए. पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश तायडे यांनी केले. तर सूत्रसंचालन अमरावती विभागीय काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी केले. डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button