Tejasswi Prakash Engagment : तेजस्वी-करण कुंद्राचा साखरपुडा? फोटो व्हायरल | पुढारी

Tejasswi Prakash Engagment : तेजस्वी-करण कुंद्राचा साखरपुडा? फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस विजेती आणि मॉडेल तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे टीव्हीवरील सर्वात रोमँटिक कपलपैकी एक आहेत. दोघेही ‘बिग बॉस-१५’ पासून एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप बोलले जाते आणि सोशल मीडियावर एकमेकांवर ते प्रेमाचा वर्षावदेखील करताना दिसतात. अलीकडेच तेजस्वी प्रकाशने तिचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. तेजस्वी प्रकाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या एंगेजमेंट रिंगचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये आणि हातात फुले घेऊन उभी आहे. यासोबत ती तिची अंगठीही दाखवत आहे, (Tejasswi Prakash Engagment) जी खूप सुंदर आहे. तेजस्वीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत, तिचे अभिनंदन करत आहेत. पण हे पाहून काहीजण संभ्रमातही पडले आहेत. (Tejasswi Prakash Engagment)

तेजस्वी प्रकाशच्या फोटोमध्ये करण कुंद्रा दिसत नाही. त्यामुळे चाहते तिला करणच्या प्रपोजलबद्दल विचारत आहेत. एका युजरने ‘तेजू खेल गई हमारा साथ’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिले, ‘मी जो विचार करत होतो ते घडले की आणखी काही आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘घोटाळा झाला, आम्हाला वाटले करणने प्रपोज केले पण ते काही वेगळेच झाले’. त्याचप्रमाणे तेजस्वीच्या पोस्टवर चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘बिग बॉस १५’ दरम्यान करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांच्या जवळ आले होते. शोदरम्यानच करणने तेजस्वीला प्रपोज केले आणि तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहतेही खूप खूश आहेत आणि त्यांना ‘तेजरन’ म्हणत आहेत. त्याचबरोबर दोघेही अनेकदा एकमेकांच्या कुटुंबासोबत दिसत आहेत. अशात या दोघांच्या लग्नावरून चर्चा होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Back to top button