नागपूरमधील सक्करदरा पुलावर भीषण अपघात; ८० फूट खाली कोसळून चौघांचा मृत्यू | पुढारी

नागपूरमधील सक्करदरा पुलावर भीषण अपघात; ८० फूट खाली कोसळून चौघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील सक्करदरा उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. नागपूरच्या सक्करदरा परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघेजण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून खाली फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ चिमुरड्यांचा समावेश आहे.

सक्करदरा उड्डाणपुलावर एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पुलाखाली फेकले गेल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक हा मित्राची कार घेऊन बुट्टीबोरीला जात होता. मध्यरात्रीनंतर पुलावर गर्दी नसल्याने त्याने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कारवरील नियंत्रण सुटल्याने तीन गाड्यांना धडक दिली. त्यात एका दुचाकीवरून एक इसम, त्याची दोन मुले आणि आई जात होते. कारच्या धडकेमध्ये चौघेही पुलावरून खाली फेकले गेल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button