आम्ही लवकरच सत्तेत असू; मराठा सेवा संघ स्थापना दिनी डॉ.लीना निकम यांचे वक्तव्य

आम्ही लवकरच सत्तेत असू; मराठा सेवा संघ स्थापना दिनी डॉ.लीना निकम यांचे वक्तव्य

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महापुरुषांचे दैवतीकरण आम्ही होऊ देणार नाही. जर महापुरुषांचे दैवतीकरण होत असेल तर संभाजी ब्रिगेडने त्यास तोडीस तोड उत्तर दिले पाहिजे. संभाजी ब्रिगेड व शिवसेना यांची झालेली युती महत्त्वाची घटना आहे. यामुळे लवकरच संभाजी ब्रिगेड सत्तेत असणार आहे, असे मराठा सेवा संघाच्या शिवमती लीना निकम म्हणाल्या. मराठा सेवा संघाच्या नागपूर शाखेच्या वतीने ३२ वा स्थापना दिवस बळीराजा संशोधन केंद्र,नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी शिवश्री शेखर पाटील म्हणाले, आज बदललेल्या परिस्थितीत संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी ज्या पाच सत्ता सांगितल्या त्यापैकी राजसत्तेच्या जवळ संभाजी ब्रिगेड जाताना दिसत आहे. संघाची भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके म्हणाले, समाजात स्त्रियांना मानाचे स्थान देण्याचे काम मराठा सेवा संघाने केले आहे.

शिवश्री पुरुषोत्तम कडू म्हणाले, संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० ला जिजाऊंचे जन्मस्थान लखुजी जाधव यांचा सिंदखेड येथील वाडा, जे समस्त मराठा कुणबी समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्याचे नविनिकरनाचे काम सुरू केले. त्याचेच फलित म्हणजे आज जिजाऊ जयंतीला लाखो लोक येथे एकत्र येतात.

यावेळी जिजाऊंना अभिवादन म्हणून 'मानाचा मुजरा' हा संगीतमय कार्यक्रम संगीत सूर्य केशवराव भोसले कक्षा तर्फे सादर करण्यात आला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news