वाशिम: अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई ; २. ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम: अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई ; २. ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

वाशीम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ६ ठिकाणी धडक कारवाई करून २.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत ६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहीम मंगळवारी राबविण्यात आली.

वाशिम शहर हद्दीत ३९, ३९५ रुपयांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने कामरगाव येथे ६०,९८१ रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत चांडस येथे १,२४,८०० रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस स्टेशन मंगरूळपीर अंतर्गत कोष्टीपुरा येथे ३३,३०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत शेंदोना येथे ४,११२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

 सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंध व व्यापार वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा २००३ कायद्यान्वये एकूण २५ गुन्हे दाखल करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०२२ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत  अवैध गुटखा विक्री संबंधाने एकूण ६० आरोपीवर अवैध गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हे नोंदवून २.१९ कोटींचा गुटखा जप्त करण्‍यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम तसेच सर्व पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news