भंडारा : अस्थि विसर्जनासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू, तावशी नदी घाटावर दुर्घटना | पुढारी

भंडारा : अस्थि विसर्जनासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू, तावशी नदी घाटावर दुर्घटना

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : अस्थि विसर्जनासाठी नातेवाईकांसोबत गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (दि.२७) लाखांदूर तालुक्यातील तावशी नदी घाटावर घडली. धनराज एकनाथ शेंडे असे मृताचे नाव आहे.

शंकर मारुती शेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. अस्थि विसर्जनासाठी गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांसोबत धनराज गावाशेजारील चुलबंद नदीवर गेला होता. मुंडन करण्यासाठी नदीपात्रात उतरला. मात्र त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्‍याने आणि पाण्याचा प्रवाह वाढल्‍याने तो प्रवाहात वाहून गेला. ग्रामस्थांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र याला यश आले नाही.

ग्रामस्‍थांनी या घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना दिली. लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे व दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार यांनी आपातकालीन बोट आणून नदीपात्रात शोधकार्य सुरु केले. दिवसभर शोधकार्य करून मृतकाचा शोध न लागला नाही. रविवारी सकाळी घटनास्थळापासून जवळपास ३ कि. मी. अंतरावरील पाथरी चुलबंद घाटावरील नदीपात्रात लावलेल्या जाळ्यात त्याचा मृतदेह सापडला.

हेही वाचा

Back to top button