कळंबोली वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला दमदाटी | पुढारी

कळंबोली वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला दमदाटी

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : कळंबोली वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या पनवेल आणि नवी मुबई परिसरात चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने एका दुचाकी चालकाला धक्का देऊन खाली पाडल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, यामध्ये चालकाला काही दुखापत झालेली नाही.

व्हिडिओमध्ये दिसते की, कळंबोली रोडपाली सिग्नलजवळ एका दुचाकीस्वाराला नियमाचे पालन केले नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी थांबले. यावेळी वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वारामध्ये वाद सुरू झाला. याचवेळी दुचाकीच्‍या कागदपत्रांची मागणी करताना वाहतूक पोलीस दुचाकीची चावी काढण्यासाठी पुढे जातो. त्याचवेळी या वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराला जोराचा धक्का दिल्याने दुचाकीस्‍वार खाली पडल्याचे दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांची ही दबंगगिरी पाहून नवी मुबई आणि पनवेल शहरात वाहतूक पोलिसांच्या दादागिरीची चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा : 

Back to top button