वाशिम : हिंदू- मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पूष्पवर्षाव करून कावड भक्तांचे स्वागत | पुढारी

वाशिम : हिंदू- मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पूष्पवर्षाव करून कावड भक्तांचे स्वागत

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सध्या सुरू आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक श्रावण महिन्यात कावड यात्रेवर जातात. या भक्तांवर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील हिंदू- मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पूष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

मालेगाव येथे शेलु फाट्यावर कावड मंडळाच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुले टाकण्यात आले होती. यासोबत प्रत्येक मंडळाचे शाल आणि शिरफाळ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी हिंदू- मुस्लिम एकता मंचाचे विकी आहिर, तौसिफ खान, इमरान खान, जावेद चौधरी, पवन यादव, डॉ. योगेश गाभने, आसिफ खान, शेख इस्लाम, मो.मूकिम, आकाश सोनिगिराह, पवन सरनाईक, शेख अनिस, शेख फारुख, नागेश कुबडे, मोईन खान, सय्यद नदीम, उबेद मिर्झा, सय्यद मलिक व ढवळेशवर कावड मंडळचे विकास बळी, गोलू बळी, देवा राऊत आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button