जुन्नरच्या विकासकामांसाठी 5 कोटींचा निधी: आ. बेनके यांची माहिती | पुढारी

जुन्नरच्या विकासकामांसाठी 5 कोटींचा निधी: आ. बेनके यांची माहिती

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नरमधील विकासकामांसाठी आतापर्यंत पाच कोटींचा निधी दिला आहे. आणखी पाच कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच शिवनेरीच्या पायथ्याशी आधुनिक म्युझियम, नाट्यगृह, विश्रामगृह याकरिता दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. शहरामधील पुरातन श्री शनैश्वर मंदिर नव्याने बांधण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार बेनके यांच्या हस्ते झाले.

या वेळी एकनाथ महाराज शिंगोटे, भाऊ देवाडे, फिरोज पठाण, दीपेश परदेशी, अलका फुलपगार, हाजरा इनामदार आदी उपस्थित होते. महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या अनेक विकासकामांना सध्याच्या शासनाने स्थगिती दिली आहे. याचा फटका जुन्नर तालुक्यामधील मंजूर करून आणलेल्या अनेक विकासकामांना बसला आहे. परंतु, या कामांचा नव्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणणार असल्याचे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले. शनैश्वर मंदिरासाठी आमदार निधीतून चाळीस लाखांचा निधी देणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.

Back to top button