यवतमाळ : आरोग्य केंद्राच्या दारावरच महिलेची प्रसुती; उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू     

यवतमाळ : आरोग्य केंद्राच्या दारावरच महिलेची प्रसुती; उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू     

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारावरच एका महिलेची प्रसुती झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२०ऑगस्ट) घडला. दुर्दैवी बाब म्हणजे या महिलेच्या पोटातील बाळ प्रसुतीदरम्यान दगावल्याने संताप व्यक्त केला जातोय. सदर महिलेला योग्य उपचार मिळू न शकल्यामुळे तिचं बाळ दगावलं असल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. येथुन आठ किमी अंतरावर असणार्‍या विडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे. प्रसुतीदरम्यान, महिलेचं बाळ दगावल्यानं कुटुंबीयांनीही राग व्यक्त करत आरोग्य यंत्रणेवर टीका केली. या महिलेची प्रसुती झाली, त्यावेळी रुग्णालयात कुणीच उपस्थित नव्हते,शुभांगी सुदर्शन हापसे ( रा, टाकळी.) असे या महिलेचे नाव आहे.

सदर महिलेला प्रसुती कळा होत होत्या. हे  गाव या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत असल्याने या महिलेला टाकळी येथून येथे प्रसुतीसाठी आणण्यात आले होते. पण तिथे आल्यानंतर या महिलेची उपेक्षा झाली, असा आरोप कुटुंबियांनी केला. या महिलेचा आरोग्य केंद्राच्या गेटवरच प्रसुती झाली आणि प्रसुतीदरम्यान या महिलेचे बाळ दगावले. त्यामुळे पीडित महिलेले कुटुंबीय राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर संतापले त्यांनी. व्हिडिओ रेकॉर्ड करत आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केले. विशेष म्हणजे रुग्णालयात कुणीच नव्हते, असा आरोप करण्यात आला.

दरम्यान आज जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देऊन घटनेची माहिती घेतली व या संदर्भात ज्या कोणाची हलगर्जी सदर घटनेस कारणीभूत असेल त्यांचे वर निश्चित कार्यवाही करण्यात, येईल असे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news