चंद्रपूर : वाघ जखमी असल्याचे ट्रॅप कॅमेरात कैद

चंद्रपूर : वाघ जखमी असल्याचे ट्रॅप कॅमेरात कैद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर वनपरिक्षेत्रातील झरी- बंदर बिटात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला आहे. मागील तीन दिवसांपासून तो उपचाराविना याच परिसरात फिरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या पट्टेदार वाघावर उपचार करण्यासाठी वन विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीची गरज आहे. मात्र, अद्याप परवानगी न मिळाल्याने वाघ बिचारा स्वतः चा जीव वाचविण्यासाठी जंगलात फिरत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पट्टेदार वाघांची संख्या आहे. ताडोबातील वाघांचा रूबाबदारपणा पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु, या वाघांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होतात दिसून येत आहे. चिमुर वनपरिक्षेत्रातील झरी–बंदर बिटात मागील तीन दिवसांपासून एक जखमी पट्टेदार वाघ जंगलात वनवन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमी असलेला पट्टेदार वाघ खडसंगी प्रादेशिक व बफर झोनमध्ये भ्रमंती करीत असल्याचा अनुमान आहे. याबाबत वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता अधिकारी मात्र, संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी पट्टेदार वाघाची माहिती अन्य वनाधिकाऱ्यांकडून देण्याचा प्रयत्न केला असता टाळाटाळ केली जात आहे. या जखमी वेळेत उपचाराची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.

चिमुर वनपरिक्षेत्र व बफर झोन खडसंगी परिसरात या वाघाचा वावर असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत वनवन फिरत असल्याने त्याला जखम नेमकी कशामुळे झाली?, जखम नेमकी कोठे आहे ?, जर जखमी वाघ ट्रॅप कॅमेरात आला असेल तर त्यांचेवर तातडीने उपचार का झाले नाहीत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने वन्यजीव प्रेमीं विचारत आहेत.

वाघ जखमी असल्याचे ट्रॅप कॅमेरात कैद

रानोरान फिरणाऱ्या जखमी वाघाला डोळा व कानाच्या जवळ जखम असून, ट्रॅप कॅमेरात आढळून आले आहे. जखमी वाघाबाबात वनविभागाला माहिती झाली असता तसा अहवाल डिएफओ यांच्याकडे पाठविण्यात आल्याची सुत्रांनी सांगितले. यानंतर वनविभागाच्या मते वाघाच्या झुंजीत वाघ जखमी झाला असून, पायाला जखम असल्याची माहिती वनविभागाकडून दिली जात आहे.

हेही वाचलंत का? 

चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत झरी–बंदर बिटात कॅमेरे लावून जखमी वाघावर तातडीने उपचार करून वाघाला जिवदान द्यावा.
– कवडू लोहकरे, वन्यजीव व पर्यावरण प्रेमी चिमूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news