रत्नागिरी : कुवे येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू | पुढारी

रत्नागिरी : कुवे येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

लांजा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा कुवे येथे नवीन पेट्रोल पंपाच्या वायरिंगचे काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सुनील साळवी (वय ५४, कूवे पुरावाडी) असे त्याचे नाव आहे. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा शहरानजीकच्या कुवे येथे महामार्गालगत नितीन जोगळे हे नवीन पेट्रोल पंप बांधत आहेत. या पेट्रोल पंपामध्ये देखरेखीच्या कामसाठी सुनील साळवी होते. बुधवारी सायंकाळी पेट्रोल पंप येथे लाईटच्या प्लगमध्ये वायर जोडत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button