गडचिरोली पोलिस दलाच्या ‘पोलिस दादालोरा खिडकी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार | पुढारी

गडचिरोली पोलिस दलाच्या ‘पोलिस दादालोरा खिडकी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हा पोलिस दलाने सुरु केलेल्या ‘पोलिस दादालोरा खिडकी’च्या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोलिसने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसीपी पुरस्कार घोषित केला आहे. लीडरशिप इन कम्युनिट पोलिसींगसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ठ काम करणा­या संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये ‘बेस्ट इन लार्ज एजन्सी’ या विभागातून गडचिरोली पोलिस दलाची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत, नक्षल पीडित तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभीर्याने विचार करून गडचिरोली पोलिस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत विविध पोलिस ठाणे, उपकेंद्रे आणि पोलिस मदत केंद्रांच्या ५३ ठिकाणी ‘पोलिस दादालोरा खिडकी’ सुरू केल्या आहेत. या पोलिस दादालोरा खिडकीमधून एकाच ठिकाणी नागरिकांना विविध योजनांचे लाभ देण्यात येत आहेत.

हेही वाचा

औरंगाबाद : नाना पटोलेंनी पदयात्रेतून घेतला काढता पाय

राधानगरी : गुडाळ येथे घर फोडी, चोरट्यांनी दुचाकी पळवल्‍या

तपासासाठी आलेल्या बिहारच्या महिला पोलिसाने बावधनमध्ये घेतला गळफास

Back to top button