गुडाळ(राधानगरी), पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील संभाजी तुकाराम पाटील यांचे चोरट्यांनी घरफोडले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. शेजा-यांना याबाबत समजले असता त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
संभाजी पाटील हे पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक असून गुडाळ-खिंडी व्हरवडे या मुख्य रस्त्यावर यावर्षीच त्यांनी नवे घर बांधले आहे. घर बंद करून मंगळवारी सकाळी पाटील पुण्याला गेले. ते पुण्याहून परत आल्यानंतर चोरट्यांनी नेमका किती ऐवज लांबवला हे स्पष्ट होणार आहे.
बुधवारी पहाटे चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील कपडे, इतर साहित्य विस्कटले आहे. बुधवारी दिवसभर ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र बुधवारी रात्री गुडाळ गावठाण मध्ये राहणारे संभाजी यांचे जेष्ठ बंधू विठ्ठल पाटील यांना काही ग्रामस्थांनी संभाजी पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. विठ्ठल यांनी तिकडे धाव घेतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, बुधवारी रात्रीच राधानगरी येथे चोरट्यांनी बंद घरे फोडून घरफोड्या केल्या आहेत. तसेच दुचाकी ही लांबविल्या आहेत याच चोरट्यांनी परतीच्या मार्गावर असताना गुडाळमध्ये घरफोडी केली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा