विदर्भात पावसाचा हाहाकार: नागपुरातील दोनशे वर्ष पुरातन शिवमंदिर कोसळले; पाच जण जखमी | पुढारी

विदर्भात पावसाचा हाहाकार: नागपुरातील दोनशे वर्ष पुरातन शिवमंदिर कोसळले; पाच जण जखमी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूरसह विदर्भात पावसाचा धुमाकुळ सुरु असून, ओढे नाले तलाव तुंडुब भरून वाहत आहे. शहरातील अंबाझरी, फुटाळा तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. नागपूर शहरातील भालदारपुरा भागातील दोनशे वर्ष पुरातन शिव मंदिराचा काही भाग आज (दि.१०) पहाटे कोसळला. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या छोट्या छोट्या तीन घरांवर मंदिराचा काही भाग कोसळला. फायर ब्रिगेडने बचाव कार्य सुरू करत ६ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात भरती केले आहे.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाने कळविले आहे. तसेच शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान खात्याने आज व उद्या रेड अलर्ट चा इशारा दिला आहे.

संपूर्ण विदर्भ जलमय

बुधवारी (दि.१०) दिवसभर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यामध्ये अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसेच बुलडाणा, वाशीम जिल्ह्याच्याही अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील ज्या तालुक्यांना अतिवृष्टीचा धोका आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चामोर्शी, गडचिरोली, वडसा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, भंडारा, तुमसर, लाखणी, लाखांदुर, मुल, सावली, लाखणी, लाखांदुर, नागपूर रामटेक, पारशिवणी, मौदा, ऊमरेड, सावनेर, नरखेड, कामठी, पाचगाव, धामणा, कुही, भिवापूर, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, कारंजा, मंगरुळपीर, नेरपरसोपंत, बाभुळगाव, यवतमाळ या तालुक्यांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button