गोवा : पंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवकांचेही उत्स्फूर्तपणे मतदान | पुढारी

गोवा : पंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवकांचेही उत्स्फूर्तपणे मतदान

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात १८६ पंचायतींसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झालं तर दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४५ पर्यंत पोहोचली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या जन्मगावी पाळी कोठंबी पंचायत क्षेत्रामध्ये मतदान केले. तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सापेंद्र येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, कळंगुट पंचायतीच्या प्रभाग ९ मध्ये मतपत्रिकेवर एका उमेदवाराचे नाव व चिन्ह हे वेगवेगळे झाल्यामुळे तेथील मतदान उद्या दिनांक ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. उचगाव भागांमध्ये मतदारांना उमेदवारांने रात्री पैसे वाटण्याचे प्रकरण निवडणूक आयोगाच्या भरारी पथकापर्यंत पोहचले असून तेथील नागरिकांनी एका उमेदवाराने पैसे वाटल्याची तक्रार भरारी पथकाकडे केली आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. काही पंचायतीत ज्येष्ठ नागरिकासोबतच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या युवांनी उत्साहाने मतदान केले.

गोवा पंचायत निवडणूक
 

दुसरीकडे निवडणूक नियमाचा भंग होण्याचे प्रकार घडल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतराच्या दूर उमेदवारांच्या समर्थकांनी राहणे गरजेचे असताना अनेक मतदान केंद्राच्या २० ते २५ मीटर जवळ म्हणजेच मतदान केंद्राच्या गेटच्या बाहेर उमेदवारांचे समर्थक दिसून आले.

हेही वाचलंत का?

Back to top button