File Photo
अहमदनगर
नगर : केडगावात तरुणास बेदम मारहाण
नगर, पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरात रविवारी दुपारी दोन कुटुंबात किरकोळ कारणातूून झालेल्या वादातून तरूणाला धारदार कात्री, लोखंडी हुक व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत विष्णू साळवे (वय 34 रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मनीषा चंद्रकांत साळवे (वय 26 रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील शिरसाठ, गर्व सुनील शिरसाठ, प्रियंका सुनील शिरसाठ (सर्व रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

