नागपूर : ड्रग्ज प्रकरणातील तीन तस्करांना अटक | पुढारी

नागपूर : ड्रग्ज प्रकरणातील तीन तस्करांना अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये अलिकडेच सापडलेल्या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर कशी पोहोचली? याची माहिती घेतली असता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदिल शेख याचे नाव पुढे आले. पोलिस सध्या आदिल शेख याच्या मागावर आहेत. नागपूर शहरातील होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरूणाई नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. यातच आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किंमतीचे एमडी पावडर हे ड्रग्स जप्त केले आहे. यात एका तडीपार आरोपीला अटक करण्यात आली.

इब्राहीम खान अकबर खान (५३, हसनबाग), फारूख शेख मेहमूद (४२, मोठा ताजबाग, सक्करदरा) आणि वाहीद खान रिझवान खान (व. ३५, मोठा ताजबाग, सक्करदरा) या प्रकरणात तिघांना अटक केली.

याबबातची माहिती अशी की, तस्करांकडून मोठ्या प्रमाणात एमडी या ड्रग पावडरचा सौदा होणार असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खापरी- परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर टिम तैनात केली. इब्राहीम खान अकबर खान, फारूख शेख मेहमूद आणि वाहीद खान रिझवान खान हे तीन आरोपी तेथे आले असता त्यांच्या कारची चोकशी करत त्यांना अटक केली. आणि त्याच्याकडील २५० ग्राम वजनाची एमडी पावडर जप्त करण्यात आली. यातील इब्राहीम खान अकबर खानवर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

नागपूर शहरात काही महिन्यांपासून विविध भागात ड्रग्सचे वितरण करण्यात येत होते. यातील तस्करांबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने पोलिस यांच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर कशी पोहोचली? याची माहिती घेतली असता बदलापूर येथील आदिल शेख याचे नाव पुढे आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button