गडचिरोली : पेरमिली दुर्घटनेतील तिन्ही मृतदेहांची ओळख पटली | पुढारी

गडचिरोली : पेरमिली दुर्घटनेतील तिन्ही मृतदेहांची ओळख पटली

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : अहेरी तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. यामध्ये पेरमिली गावानजीक आलेल्‍या पुरात एक ट्रक वाहून गेला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.हाेता. ही दुर्घटना ९ जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ट्रकमध्ये पाच ते सहा जण होते. त्यातील तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटली आहे. सीताराम बिच्चू तलांडे (वय ५०), सम्मी सीताराम तलांडे (वय ४५) आणि पुष्पा नामदेव गावडे (वय १३) रा. मोकेला, ता. भामरागड अशी मृतांची नावे आहेत.

मृत तलांडे हे त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी गावाकडे जात होते. ट्रक पुरात वाहून गेल्‍याने त्यांचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापनची पहाटेपासून शोधमोहीम सुरू आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button