चंद्रपूर शहरात हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’

एअर प्युरीफायर टॉवर
एअर प्युरीफायर टॉवर
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशभरात हवा प्रदूषणात आघाडीवर असलेल्या विदर्भातील चंद्रपूर शहराच्या हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी चंदीगडच्या धर्तीवर शहरात 'चंद्रपूर शहरात एअर प्युरीफायर टॉवर' खनिज विकास निधीमधुन उभारण्याची मागणी इको-प्रोच्यावतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचेकडे करण्यात आलेली आहे.

चंद्रपूरी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण विषयक व्यापक उपाययोजना, विविध माध्यमांद्वारे जनजागृती, आरोग्य सर्वेक्षण व प्रदूषण नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती करिता यंदा इको-प्रो तर्फे यावर्षात 'माझा हक्क, शुध्द हवा!' हे अभियान राबविण्याला प्रारंभ करण्यात आलेला आहे.

प्रदूषणाच्या तीव्रतेचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 'चंदीगड' शहरात यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर चंद्रपूर शहरातही एअरप्युरीफायर टॉवर उभारण्याची मागणी इको-प्रो तर्फे चंद्रपूरचे जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे करण्यात आलेली आहे. इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे.

एअर प्युरीफायर टॉवर

भारतीय तंत्रज्ञानाने विकसीत केलेले प्रदुषीत हवा शुध्द करणारे संयंत्र 'एअर प्युरीफायर टॉवर' उत्तम पर्याय असुन यामुळे बऱ्याच अंशी प्रदुषणात घट होते. मागील वर्षी 'चंदीगड' शहरात याच प्रकारे सयंत्र उभारण्यात आलेले असून सदर टॉवरच्या माध्यमातून हवा प्रदूषणावर मात करण्यात आले आहे. हे टॉवर देशातील सर्वात उंच २४ मीटर उंचीचे आहे.

एक किमीच्या त्रिजेमध्ये असलेली हवा शुध्द करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. या आधुनिक एअर प्युरीफायर टॉवरची स्थापना 'चंदीगड' मधील टॉप लिस्टेड प्रोजेक्टस् पैकी एक आहे. टॉवरमुळे ओढुन घेतलेले प्रदुषीत हवा आणी शुध्द करून वातावरणात सोडण्यात येते. यामुळे तापमानात सुध्दा घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात प्रदूषण नियंत्रणास प्राधान्य हवे!

प्रदूषण नियत्रंणात आणणारी आधुनिक सयंत्र प्रकल्प राज्यातील व देशातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या चंद्रपूर शहरात आवश्यक आहे. चंद्रपूर शहराच्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषणमुक्तीचे या प्रकारच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे इको प्रोचे बंडु धोतरे यांनी निवेदनात म्हटले आहे. यांसदर्भात एअर प्युरीफायर टॉवर बाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महानगरपालीका आयुक्त राजेश मोहितेआदिना चंदीगडमध्ये उभारण्यात आलेल्या एअर प्युरीफायर टॉवरच्या कार्यप्रणालीबाबत सादरीकरणारे माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news