वाकड, काळा खडक परिसरात पाणीटंचाई | पुढारी

वाकड, काळा खडक परिसरात पाणीटंचाई

वाकड : ऐन पावसाळ्यातही वाकड, काळा खडक परिसरात नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. काळा खडक परिसरात पाण्याच्या टाकी शेजारील पंप जळाल्यामुळे पाणी टाकीमध्ये चढविता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वाकड परिसरात दिवसाआड पाणी येत आहे. पावसाळ्यामुळे पाणी भरण्यासाठी सुद्धा नागरिकांचे हाल होत आहेत. पालिकेने टँकरची सोय केली परंतु ती सुद्धा अपुरी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दोन दिवसांपासून होणार्‍या पाणी टंचाईबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता, मोटार जळाली असल्याचे सांगण्यात आले. सून आल्याचे मत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले. मागील दोन दिवसापासून परिसरात पाऊस सुरू असून पाण्याचा टँकर आला तरी पाणी भरण्यासाठी लोकांना पावसात भिजत उभे रहावे लागत आहे.

काळा खडक येथील टाकी भरण्यासाठीची मोटार नादुरुस्त झाली असल्यामुळे पाणी टाकीमध्ये चढवता येत नाही. लवकरच ही मोटार दुरुस्त करून वाकड, काळा खडक परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– वासुदेव मांढरे, अभियंता, जलशुद्धीकरण केंद्र, सेक्टर 3

Back to top button