‘इंस्टाग्राम’वरील मैत्रीला अल्‍पवयीन प्रियकर 'भुलला', बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्याखाली बालसुधारगृहात रवानगी | पुढारी

‘इंस्टाग्राम’वरील मैत्रीला अल्‍पवयीन प्रियकर 'भुलला', बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्याखाली बालसुधारगृहात रवानगी

नागपूर पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशात शाळेत शिकत असलेला मुलगा आणि नागपुरातील २३ वर्षीय तरुणीची ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झाली. झालेल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. एकटी असताना तिने त्याला घरी बोलाविले. मात्र अचानक तरुणीची आई घरी आली. तिने दाेघांना ‘नको त्या अवस्थेत’ पाहिले.  दोघांचीही पंचाईत झाली. तरुणीच्या आईने मुलाविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतली. अखेर अल्पवयीन प्रियकराविरुद्ध पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा उत्तर प्रदेशमधील आहे. त्याने नागपुरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला ‘इंस्टाग्राम’वरून संदेश पाठवला. त्यातून ओळख वाढली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत चॅटिंग सुरू केले. तिने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी त्या अल्पवयीन मुलाला नागपुरात भेटायला बोलावले. त्यासाठी तिने त्याला पैसेही दिले.

नागपुरात असलेल्या हॉटेलमध्ये सहमतीने दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ३० जूनला तिने पुन्हा त्याला नागपुरात बोलावून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी मुलीची आई नातेवाईकाकडे गेली होती. घरी कुणी नसल्याने तिने प्रियकराला घरी नेले. मात्र, तासाभरातच मुलीची आई घरी परतली. दोघांनाही ‘नको त्या’ अवस्थेत पाहून चिडलेल्या आईने मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.मुलीने पोलिसांत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरूनअल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्‍यात आली आहे.

हे वाचलंत का?

Back to top button