भिवंडीत पाऊणेतीन लाखांची वीजचोरी | पुढारी

भिवंडीत पाऊणेतीन लाखांची वीजचोरी

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडी शहरात वीज वितरण व वीज बिल वसुली करणार्‍या टोरेंट पॉवर कंपनी कडून नियमित वीज चोरी करणार्‍यांविरोधात कारवाई करीत दंड आकारून गुन्हे दाखल केले जात आहेत. नुकताच शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा वीज चोरांविरोधात 2 लाख 87 हजार 499 रुपयांच्या वीजचोरी बद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात हसीन सिनेमा जवळील इस्लामपुरा येथील मोमीन मस्जीद जवळ राहणारे मोमीन अरबाझ अबरार यांनी मे 2021 ते फेब्रु 2022 दरम्यान अनधिकृत वीज जोडणी घेऊन 6163 युनिट वीज वापर करून 1 लाख 45 हजार 216 रुपयांची वीज चोरी केली.

तर नागाव औलिया मस्जिद परिसरातील दिलवरी अपार्टमेंट या इमारतीत शेख कमरुद्दीन अब्दुल समद यांच्या नावे असलेल्या फ्लॅटमध्ये विजवापर करणारे राआदम खान यांनी सुद्धा विजमिटर बायपास करून अनधिकृतरित्या विजपुरवठा घेवून 5755 युनिट वीज वापरून 1 लाख 33 हजार 283 रुपयांची विजचोरी केल्याचे उघड झाले. या दोघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात वीज अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button