

अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : पीएसआयची आत्महत्या : शहरातील फ्रेजरपुरा येथे कार्यरत असलेले पीएसआय अनिल मुळे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
पीएसआयची आत्महत्या ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास महालक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या खुल्या प्लॉटमध्ये घडली.
गत सहा महिन्यांपासून अनिल मुळे हे वैद्यकीय कारणामुळे रजेवर होते. परिसरातील नागरिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
त्यांनी नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे.