सावधान : रेल्‍वे स्‍थानकावर भीक मागायचे नाटक करीत मोबाईल चोरी | पुढारी

सावधान : रेल्‍वे स्‍थानकावर भीक मागायचे नाटक करीत मोबाईल चोरी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी नागपुरातील रेल्वे स्थानकावर चोरीचे प्रमाण वाढले आहे. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी केले जात आहेत. यामध्ये एका घटनेत चार चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. तर दुसऱ्या घटनेतील चोरट्याला २ तासांतच अटक केली आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महिला रेल्वे प्रवाशाचे मोबाईल चोरी करणारा आरोपी गोलू मेंडका काळे (वय २४ ) हा मुळचा उत्तर प्रदेश मधील झाशी जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो शहरातील काही चौकांत वस्तू विक्री करायचा तसेच काही चौकात भीक मागत होता.

कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी महिला शेषा पुनाराम काग (वय ३९) यशवंतपुर-गोरखपुर एक्सप्रेसने भोपाळ येथे जात होत्या. रेल्वे नागपूरात पोहोचताच त्या पाणी घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरल्या. या दरम्यान झालेल्या गर्दीत त्यांचा फोन चोरीला गेला. त्यांनी रेल्‍वे पोलिसांकडे (जीआरपी) तक्रार केली. जीआरपीच्या गुन्हे पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने आणखी ३ मोबाईल चोरी केल्‍याची कबूली त्‍यांने दिली. त्याच्याकडून एकूण ४८ हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत .

हेही वाचा

Back to top button