वाशिम : झाड कोसळल्याने अंगणात झोपलेल्‍या बालकाचा मृत्‍यू | पुढारी

वाशिम : झाड कोसळल्याने अंगणात झोपलेल्‍या बालकाचा मृत्‍यू

वाशिम ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदोणा गावात शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यादरम्यान पिंपळाचं झाड अंगावर कोसळल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. नयन धनाजी सातपुते (वय ५) असे त्‍याचे नाव आहे.

या दुर्घटनेत एक महिला आणि एक पुरुषही गंभीररित्या जखमी झाला आहे. दरम्यान गावात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील सर्व सदस्य अंगणात झोपले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button