नागपूर महानगरपालिकेत नव्या १४ प्रभागांची वाढ | पुढारी

नागपूर महानगरपालिकेत नव्या १४ प्रभागांची वाढ

नागपूर पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने आज (दि. 17) नागपूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. यानुसार आता नागपूर महानगरपालिकेत अंतिम प्रभागांची संख्या ५२ एवढी झाली आहे. या पूर्वी नागपूर महानगरपालिकेत ३८ प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या १४ प्रभागांची वाढ झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात १५१ नगरसेवक होते, ही संख्या १५६ होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या प्रभागाची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे. यात ११३ जागा सर्वसामान्य करीता असतील तर जनरल ३१ जागा एससी आणि १२ जागा एसटी करीता राखीव असतील.

निवडणूकीत ७८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारणपणे ४५ ते ४७ हजाराच्या आसपास असणार आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, तर काँग्रेस विरोधी पक्षात आहे. भाजप १०७, काँग्रेस २८, बसपा १०, राष्ट्रवादी १, शिवसेना २ आणि अपक्ष १ नगरसेवक आहे. तर २ जागा रिक्त आहेत.

हेही वाचा

Back to top button