Funeral Party : मयताला आल्यावर लोकांचा स्मशानभूमीत डीजेच्या तालावर नाचून धिंगाणा | पुढारी

Funeral Party : मयताला आल्यावर लोकांचा स्मशानभूमीत डीजेच्या तालावर नाचून धिंगाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुणाचा मृत्यू झाला की घरातील वातावरण अगदी दु:खद असते. प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू असतात. अंतिम निरोप देण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात आणि मृतदेहाच्या अंत्ययात्रेत (Funeral Party)  सहभागी होतात.

पण इंग्लंडच्या बर्मिंघममधून (Birmingham) एक अशी घटना समोर आली आहे, जी तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकली नसेल किंवा पाहिली नसेल. येथे अंत्यसंस्कार करताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. असं झालं की इथे कुणी रडत नव्हतं, पण इथलं दृश्य वेगळंच होतं. डीजे वाजत होते आणि लोक स्पीकर लावून स्मशानात पार्टी (Funeral Party) करत होते.

हे प्रकरण आहे इंग्लंडमधील बर्मिंघम येथील विटन स्मशानभूमीतील (Witton Cemetery, Birmingham). कॅटी नावाच्या महिलेचे निधन झाले होते. जेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्र अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा तेथे शांतता सभेचे आयोजन करण्यात आले नव्हते. तर, तेथे शोक करण्याऐवजी त्यांनी पार्टी  (Funeral Party) करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

डीजे दणदणाट

कॅटीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिला स्मशानात नेण्यासाठी लोक नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. डीजेद्वारे जोरदार संगीत वाजवले जात आहे. प्रत्येकजण नाचत आहे. या लोकांचे थडग्याभोवती नाचतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लोकांचा संताप

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहून लोकही संतापले. त्याचवेळी, काहींनी लिहिले की, कॅटी कुठेही असेल, तिला असा डान्स पाहून खूप आनंद होईल. काही लोकांना हा अनोखा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यांनी यावर संताप व्यक्त केला. एक प्रकारे लोकांनी त्याला थडग्यांचा अनादर करणारा म्हटले आहे.

Back to top button