अमरावती : सावत्र बापाकडून चिमुकलीचे लैंगिक शोषण

अमरावती : सावत्र बापाकडून चिमुकलीचे लैंगिक शोषण
Published on: 
Updated on: 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :

सावत्र वडिलाकडून सात वर्षीय चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, (12 मे) उघडकीस आली. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयाने आरोपी वडिलाला 15 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आई कामावर गेल्यानंतर मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान सावत्र वडील घरी आला. त्याने घरात मुलीला एकटी पाहून तिला जवळ घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलीने आरडाओरड केली, त्यावेळी सावत्र वडिलाने तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर तिला मुलीने घडलेला प्रकार सांगितला. सावत्र वडिलांचे हे कृत्य पाहून मुलीच्या आईला धक्काच बसला. तिने पीडित चिमुकलीला सोबत घेऊन वलगाव पोलीस ठाणे गाठले आणि वडिलांविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सावत्र वडिलाविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news